उत्तर :-
वैशिष्ट्ये झाडाचे/वेलीचे नाव
(अ) निळसर फुलांचे तुरे कडुनिंबाचे झाड
(आ) गुलाबी रंगांची कोवळी पालवी पिंपळाचे झाड
(इ) गुलाबी गेंद मधुमालती
(ई) कडवट उग्र वास करंजाचे झाड
(उ) दुरंगी फुले घाणेरी
(ऊ) तीन पाकळ्यांचे फूल माडाचे झाड
(ए) पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली फळे फणस
उत्तर :- वसंतऋतूतील सर्व सर्जन, निसर्गातील सौंदर्य, विविध वृक्षांवर डोलणारी मधुर रसांनी भरलेली फळे, यांमुळे वसंताचे खरेखुरे परिपूर्ण, उत्कट दर्शन चैत्रातच होते. म्हणून चैत्र हा खरा वसंतात्मा, मधुमास आहे.
उत्तर :- अवतीभोवती दिसणारी सुंदर सुंदर निसर्गदृश्ये म्हणजे निसर्गाची चित्रलिपिच होय. निसर्ग न्याहाळता न्याहाळता मन या घरट्यांजवळ थोडेसे रेंगाळते. पुढे सरकावे असे वाटतच नाही. इथे आपण जणू विराम घेतो.
उत्तर :-‘अ’ गट ‘ब’ गट
(१) लांबलचक देठ (अ) कैऱ्याचे गोळे
(२) अर्धवर्तुळ, पांढरी टोपी (आ) करंजाची कळी
(३) भुरभुरणारे जावळ (इ) माडाच्या लोंब्या
उत्तर :-
शब्द अर्थ
निष्पर्ण पाने निघून गेलेला
निर्गंध गंध निघून गेलेला
निर्वात हवा नसलेला
निगर्वी गर्व नसलेला
नि:स्वार्थी स्वार्थ नसलेला
(अ) लहानसहान अपयशाने दुखी होणे अयोग्यच.
लहानसहान अपयशाने व्यथित होणे अयोग्यच.
(आ) गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात
गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती रूंजी घालतात.
(इ) मोठ्या माणसांबद्दल चुकीचे बोलणे हासुद्धा अपराधच.
मोठ्या माणसांबद्दल कुचेष्टा करणे हासुद्धा अपराधच.
(ई) सध्या घरामध्ये उंदरांची संख्या वाढल्याने अनेक
पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत.
सध्या घरामध्ये उंदरांचे पेव फुटल्यामुळे अनेक
पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत.
उत्तर :-
शब्द प्रत्यय त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द
(१) अतुलनिय नीय प्रशंसनीय
(२) प्रादेशिक इक सामाजिक
(३) गुळगुळीत ईत मुळमुळीत
(४) अणकुचीदार दार टोकदार
उत्तर:-
(अ) अश्विनीला पुस्तक वाचायला आवडते.
विशेष नाम सामान्य नाम
(आ) अजय आजच मुंबईहून परत आला.
विशेष नाम विशेष नाम
(इ) गुलाबाचे सौंदर्य काही निराळेच असते.
विशेष नाम भाववाचक नाम
(ई) रश्मीच्या आवाजात वेगळाच गोडवा आहे.
विशेष नाम भाववाचक नाम
उत्तर :-
(अ) कर्ण – कान (आ) सोबती – मित्र
(इ) मार्ग – वाट (ई) हर्ष – आनंद
अ ) उत्तर
चैत्रात नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या, विविध रंगांच्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन घडले की समजावे हा वसंतऋतूच आहे. वसंतऋतूची सुरुवात फाल्गुनात होते. चैत्रामध्ये वसंतऋतू ऐन भरात आलेला असतो. त्यातही पिंपळाची पालवी डोळ्यांचे पारणे फेडून टाकते. हिरव्या-पोपटी रंगांच्या अनेक छटा झाडांवर लहरत असतात. पिंपळाचे झाड जसजसे या नवपल्लवांनी डवरून जाते, तसतशी ही गहिऱ्या गुलाबी रंगाची पाने उन्हात झळाळू लागतात. जणू काही गुलाबी
रंगाचे सुंदर सुंदर गेंदच झाडावर फुलले आहेत, असा भास होऊ लागतो. हे दृश्यरूप डोळ्यांत साठवता साठवता पानांची सळसळ ऐकावी ती पिंपळाचीच. किंबहुना पिंपळपानांच्या सळसळीवरूनच ‘झाडांच्या पानांची सळसळ’ हा शब्दप्रयोग रूढ झाला आहे. आनंददायक आल्हाददायक, मनमोहक, मनोरम, हृदयंगम, विलोभनिय, नितांत रमणीय, रम्य ही सर्व विशेषणे चैत्र महिन्यातील पालवीने डवरलेल्या पिंपळाला एकाच वेळी लावता येतील.
आ) उत्तर
चैत्र महिन्यात सृष्टी सौंदर्याने न्हाऊन निघते. अनेक रंगांचे विविध आकार फुलांच्या रूपांत डोळ्यांचे पारणे फेडतात. सर्वत्र नवनिर्मितीचा उल्हास भरलेला असतो. या सर्वांचा कळस गाठला जातो तो पक्ष्यांच्या घरट्यांत. पक्ष्यांची घरटीसुद्धा कशी, अनेक लोभस आकारांत निर्मिलेली. काही कबरी घरटी लक्ष वेधून घेतात. काही लोंबत्या आकारांची, काही वाटोळ्या आकारांची, काही पसरट गोल, अशी विविध रूपांतील घरटी असतात. ही घरटी रमणीय निर्मितीचे दर्शन घडवतात. ही घरटी म्हणजे जणू चित्रलिपीच वाटते. चैत्रामध्ये निसर्गाचे जे रूप दिसते, ते जणू निसर्गाचे साहित्य होय. हे साहित्य वाचताना आपण घरट्याजवळ रेंगाळतो. म्हणून ती विरामचिन्हे.
इ) उत्तर
वसंतऋतूचे दिवस होते. मामाच्या शेतात एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल शंभर आंब्यांची झाडे होती. त्या प्रत्येक झाडाला वेगवेगळी नावे. काही आंबे लोणच्यासाठी प्रसिद्ध होते तर काही रसासाठी. काही आंबे आकाराने खूपच लहान. त्याचे नाव गोटी आंबा. त्याचा पाड खूपच गोड. एका आंब्याचे नाव केसरी आंबा. त्याचा रंग केसरी. तो आकाराने मोठा आणि चवीने गोड होता. आम्ही सकाळी लवकरच शेतात गेलो. शंभर झाडांपैकी दहा झाडांच्या कैऱ्या मी स्वतःच दगडं मारून पाडल्या. प्रत्येक कैरी वेगळी होती. पूर्ण दिवस कैऱ्या पाडण्यातच गेला आणि जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा पाय भयानक दुखत होते. घरचा रस्ता धरला आणि सरळ घरी गेले. जेवन केल्या केल्या कधी झोप लागली ते समजले पण नाही.