सचिन तेंडुलकर वाढदिवस विशेष

E-Swadhyay
0 Min Read
आवडल तर शेअर करा.

sachin tendulkar birthday special

सचिन रमेश तेंडुलकर ( २४ एप्रिल, इ.स. १९७३, मुंबई) हा क्रिकेटविश्वात डॉन ब्रॅडमन याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. इ.स. २००२ मध्ये आपल्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षीच, विस्डेनने डॉन ब्रॅडमन याच्यानंतर सर्व कालिक दुसरा सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील व्हिव रिचर्ड्स याच्यानंतरचा दुसरा सर्वकालिक सर्वोत्तम फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकर यांनची निवड केली होती. २०११ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात तेंडुलकरचा समावेश होता. इ.स. २००३ मधील क्रिकेट विश्वचषकात तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. २० नोव्हेंबर २००९ रोजी त्याने कारकिर्दीतील ३०,००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला. सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव मानले जाते.


पद्मविभूषण आणि राजीव गांधी खेलरत्‍न या पुरस्कारांनी तो सन्मानित केला आहे. सचिनला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. हा सन्मान त्यांना त्याच्या क्रिकेट मधील निवृत्तीच्या दिवशी जाहीर झाला. भारतीय वायुसेना दलाने त्याला ग्रुप कॅप्टन हा गौरवात्मक हुद्दा प्रदान केलेला आहे. असा मान मिळालेला ते पहिले खेळाडू आणि विमानोड्डाणाची पार्श्वभूमी नसलेले पहिले व्यक्ती आहेत. राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स ने आणि म्हैसूर विद्यापीठाने सचिन यांना मानद डॉक्टरेट पदव्या प्रदान केलेल्या आहेत. ६ नोव्हेंबर २०१२ रोजी सचिनला मुंबईत मेंबर ऑफ दी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा गौरव प्रदान करण्यात आला. तेंडुलकर हे राज्यसभेचे खासदारही होते.

सचिन तेंडुलकरचा जन्म २४ एप्रिल १९७३ मध्ये मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. सचिनच्या कुटुंबीयांचे आवडते संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन ह्यांच्या नावावरून त्याचे सचिन असे नाव ठेवण्यात आले. सचिन त्याचे वडील रमेश तेंडुलकर ह्यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे. सचिनने त्याच्या शारदाश्रम विद्यामंदिर ह्या शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर ह्यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. शाळेत असताना त्याने आपला मित्र व सहखेळाडू असलेल्या विनोद कांबळीबरोबर हॅरीस शील्ड सामन्यात ६६४ धावांची अजस्र भागीदारी रचली. १९८८/ १९८९ साली तो आपल्या पहिल्यावहिल्या प्रथम श्रेणी सामन्यामध्ये १०० धावांवर नाबाद राहिला. त्यावेळी तो मुंबई संघामधून गुजरात संघाविरुद्ध खेळत होता. तेव्हा त्याचे वय १५ वर्षे २३२ दिवस होते, आणि त्यावेळी हा विक्रम करणारा (पहिल्या सामन्यात शतकी खेळी) तो सर्वांत तरुण खेळाडू होता.

सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९८९ साली Flag of Pakistan.svg पाकिस्तान कराची येथे खेळला. त्या सामन्यात त्याने वासिम अक्रम, इम्रान खान, अब्दुल कादीर आणि वकार युनूससारख्या दिग्गज गोलंदाजांचा सामना केला. सचिनची आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सुरुवात निराशाजनक झाली. वकार युनूस, ज्याचा सुद्धा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता, त्याने सचिनला १५ धावांवर त्रिफळाचीत केले. याचे उट्टे सचिनने फैसलाबाद येथील कसोटी सामन्यात आपले पहिले अर्धशतक झळकावून काढले. सचिनची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील सुरुवातही खराब झाली. डिसेंबर १८ला झालेल्या आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खाते उघडण्यापूर्वीच (पुन्हा) वकार युनूसने त्याला बाद केले. वरील मालिकेनंतर न्यू झीलंडच्या दौऱ्यात त्याचे पहिले कसोटी शतक १२ धावांनी हुकले. त्या सामन्यात (नंतर भारताच्या प्रशिक्षकपदी आलेल्या) जॉन राईटने सचिनचा झेल पकडला ज्यायोगे सचिन जगातला सर्वात तरुण शतकी खेळी करणारा खेळाडू बनण्यापासून वंचित राहिला. अखेर १९९० सालच्या इंग्लंडच्या दौऱ्यात सचिनने आपले पहिले कसोटी शतक झळकवले. परंतु ह्या काळात त्याच्याकडून फारश्या लाक्षणिक खेळ्या झाल्या नाहीत. तेंडुलकरला खरा सुर त्याच्या १९९१-९२ सालच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात गवसला, ज्यात त्याने पर्थमधील वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर सुंदर शतकी खेळी केली. सचिनला आत्तापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये ११ वेळा सामनावीराचा बहुमान मिळाला आहे व २ वेळा तो (बॉर्डर-गावसकर चषकामध्ये ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया) मालिकावीर राहिला आहे.

सचिनने आपले पहिले एकदिवसीय सामन्यांमधील शतक सप्टेंबर ९, इ.स. १९९४ साली कोलंबो, श्रीलंका येथे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवले. त्याला पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक नोंदवण्यासाठी ७९ सामने वाट पहावी लागली. सचिन हा एकमेव असा खेळाडू आहे की ज्याने रणजी चषक, दुलिप चषक आणि इराणी चषकाच्या आपल्या पहिल्या सामन्यांमध्ये शतक झळकावले.

१९९७ साली विस्डेनने सचिनला त्या वर्षीचा सर्वोत्तम वार्षिक क्रिकेटपटू घोषित केले. ह्याच वर्षी सचिनने पहिल्यांदा १००० कसोटी धावा केल्या. ह्याची सचिनने १९९९, २००१ आणि २००२ साली पुनरावृत्ती केली.

तेंडुलकरच्या नावे एका वर्षात १००० धावा करण्याचा विक्रम आहे. हा पराक्रम त्याने सहा वेळा केलेला आहे (१९९४, १९९६, १९९७, १९९८, २०००, २००३). १९९८ साली त्याने १८९४ एकदिवसीय धावा केल्या. हा त्याचा विक्रम अजून कोणीही मोडू शकलेला नाही.त्याने कसोटी मध्ये ४९ शतके तर वन -डे मध्ये ५१ शतकाचा विक्रम अजून कोणी मोडू शकला नाही. सचिनने वयाच्या अकराव्या वर्षी क्रिकेट स्वीकारले आणि १५ नोव्हेंबर १९८९ रोजी पाकिस्तानविरुद्ध कराची येथे सोळाव्या वर्षी कसोटी सामन्यात पदार्पण केले आणि जवळजवळ चोवीस वर्षे आंतरराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबईचे प्रतिनिधित्व केले. २००२ मध्ये, कारकिर्दीच्या अर्ध्या पलीकडे, विस्डेन क्रिकेटर्सच्या अ‍ॅलमॅनॅकने त्याला डॉन ब्रॅडमन आणि व्हिव्ह रिचर्ड्सच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा वनडे फलंदाज म्हणून स्थान दिले. त्याच्या कारकिर्दीच्या शेवटी, सचिनने २०११ वल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा एक भाग होता, सहा वर्ल्डकपमध्ये भारतासाठी केलेला हा पहिला विजय. २००३ च्या दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या स्पर्धेच्या आवृत्तीत त्याला यापूर्वी “प्लेअर ऑफ द टूर्नामेंट” म्हणून गौरविण्यात आले होते.

सचिनने १९९४ मध्ये अर्जुन पुरस्कार, १९९७ मध्ये राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान, १९९९ आणि २००० मध्ये अनुक्रमे पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कार, भारताचा चौथा आणि दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार. १६ नोहेंबर२०१३ रोजी झालेल्या अंतिम सामन्याच्या काही तासांनंतर पंतप्रधान कार्यालयाने त्यांना भारतरत्न, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याचा निर्णय जाहीर केला. तो आत्तापर्यंतचा सर्वात तरुण प्राप्तकर्ता आणि पुरस्कार मिळविणारा प्रथम खेळाडू आहे. त्याने आयसीसी पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूसाठी सर गारफिल्ड सोबर्स करंडकही जिंकले. २०१२ मध्ये तेंडुलकर यांना भारतीय संसदेच्या वरील सभागृहात राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली. भारतीय वायुसेनेद्वारे ग्रुप कॅप्टनचा मानद रँक मिळवून देणारा तो पहिला खेळपटू आणि विमानचालन पार्श्वभूमी नसलेला पहिला माणूस होता. २०१२ मध्ये त्याला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाचा मानद सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले.

२०१० मध्ये, टाईम मासिकाने सचिनला “जगातील सर्वाधिक प्रभावशाली लोक” म्हणून निवडले जाणाऱ्या वार्षिक टाईम १०० च्या यादीमध्ये समाविष्ट केले. डिसेंबर २०१२ मध्ये सचिनने वनडेमधून निवृत्तीची घोषणा केली. ऑक्टोबर २०१३ मध्ये ट्वेन्टी -२० क्रिकेटमधून निवृत्त झाले आणि त्यानंतर वेस्ट इंडीज विरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्याने २०० वे कसोटी सामना खेळल्यानंतर १६ नोव्हेंबर २०१३ रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सचिनने एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आणि ३४,३५७ धावा केल्या.


Share This Article