राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयता 4 थी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ नंतर भरवण्याबाबत.

शासन निर्णय शालेय वेळ बदल

E-Swadhyay
2 Min Read
आवडल तर शेअर करा.

संदर्भ :

१. शासन परिपत्रक क्रमांकः संकीर्ण-२०२४/प्र.क्र. २७/एस.डी.-४, दिनांक -०८/०२/२०२४

२. मा. शिक्षण संचालनालय (प्राथ), यांचे पत्र क्र. प्राशिस/८०२/संकीर्ण/१६४५/२०२४, दि.०१.०३.२०२४

३. मा. शिक्षण संचालनालय (प्राय), यांचे पत्र क्र. प्राशिस /८०२/संकीर्ण/२७५२/२०२४. दि.२९.०३.२०२४

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील संदर्भीय क्र. १ च्या परिपत्रकानुसार सकाळी ९ पूर्वी भरणाऱ्या राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग भरविण्याच्या वेळात बदल करणे आवश्यक असल्याने, यासाठी स्थानिक परिस्थितीचा विचार करून सकाळी ९ किंवा ९ नंतर राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग भरविण्याबायत शासनाने खालीलप्रमाणे निर्देश जारी केलेले आहे.

१. राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या ज्या शाळांची पूर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग भरण्याची वेळ सकाळी ९ वाजता अगोदरची आहे, त्या शाळांनी नवीन येणारे शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ पासून पूर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग भरण्यावाचतची वेळ सकाळी ९ किया ९ नंतर ठेवावी.

२. शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा-२००९ नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन व अध्यापनाचा निश्चित केलेला कालावधी कमी होणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी.

३. ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळांची वेळ बदलणे अगदीच शक्य होत नसेल त्यांच्या अडचणी संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी/शिक्षण निरीक्षक (प्राथमिक) यांनी मार्गदर्शन देऊन सोडविण्याची तजवीज करावी, यासाठो संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने आपल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी/शिक्षण निरीक्षक (प्राथमिक) यांच्याशी संपर्क साधून मार्गदर्शन येऊन कार्यवाही करावी,

संदर्भिय क्र. १ च्या शासन परिपत्रकानुसार वरील सूचनांचे पालन राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा करतील याबाबतची दक्षता घ्यावी.

Share This Article