PAT EXAM Payabhut Chachani 2024 पायाभूत चाचणी सूचना प्रात्यक्षिक व तोंडी प्रश्न आणि उत्तरसूची

E-Swadhyay
5 Min Read
आवडल तर शेअर करा.

भूमिका व दृष्टिकोनातील बदल :

राज्यस्तरावरून ‘STARS’ प्रकल्पांतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित चाचणी १ व संकलित चाचणी २ अशा तीन चाचण्या घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. इयत्ता तिसरी ते आठवी पर्यंतच्या प्रत्येक विद्याथ्यनि वयोगटानुरूप अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही, याची तपासणी या चाचण्यांद्वारे करता येईल.

या चाचण्यांद्वारे विद्यार्थी संपादणुकीचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करून गुणवत्ता समृद्धीसाठी आवश्यक उपाययोजना करणे तसेच शाळा सुधारित मूल्यांकन प्रक्रियेचे बळकटीकरण करणे हा उद्देश आहे.

यानुसार राज्यस्तरावरून २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती आधारित इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची संकलित चाचणी २ घेण्यात येत आहे. सदर चाचणीचा मुख्य उद्देश, विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत, हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप कृती-कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.

चाचणीचे स्वरूप :

  • संकलित चाचणी २ ही अध्ययन निष्पत्तीवर आधारित असून ती इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक, तोंडी ‘व लेखी स्वरूपाची आहे.
  • संकलित चाचणी २ विकसित करताना त्या इयत्तेतील द्वितीय सत्रातील इयत्तांच्या विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती व आवश्यक मूलभूत गणिती क्षमता/क्रिया विचारात घेतल्या आहेत.

चाचणी नियोजनकरिता सूचना

01

संकलित चाचणी २ चे पूर्वनियोजन, प्रत्यक्ष चाचणी घेणे आणि माहितीचे संकलन अशा तीन टप्प्यांचे नियोजन शिक्षकांनी इयत्तानिहाय व विषयनिहाय करावे.

02

प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेसाठी लागणारे साहित्य शिक्षकांनी चाचणी सुरू करण्यापूर्वी तयार ठेवावे. विद्यार्थी संख्येनुसार वेळेचे नियोजन करावे.

03 प्रात्यक्षिक, तोंडी व लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ द्यावा. विद्यार्थ्यांना प्रश्नाचे आकलन न झाल्यास शिक्षकांनी त्यांना प्रश्न समजण्यासाठी साहाय्य करावे; मात्र उत्तराचा संकेत देऊ नये.

04

संबंधित वर्गाच्या गणित विषय शिकविणाऱ्या शिक्षकांनीच ही चाचणी विद्यार्थ्यांकडून सोडवून घ्यावी. चाचणी तपासताना प्रश्नांचे गुण पूर्णांकात द्यावे. अर्धा गुण देऊ नये.

05

प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेसाठी विचारावयाच्या प्रश्नांचा समावेश मूळ प्रश्नपत्रिकेत करण्यात आलेला आहे. प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेची उत्तरे व कृतीसाठी वेगळा कागद वापरून त्यात विद्यार्थ्यांना आपले प्रतिसाद नोंदवण्यास सांगावें. सदर तोंडी चाचणीचे प्रश्न नमुनात्मक आहे. शिक्षक त्याच अध्ययन निष्पत्तीवरील इतर प्रश्न विद्यार्थ्यांना विचारू शकतात.

चाचणीनंतर :

01 • चाचणीची उत्तरपत्रिका तपासल्यानंतर विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद गुणनोंदणी तक्त्यात करावी.

02 गुणनोंदणी तक्त्यातील गुणांचे विश्लेषण करावे.

03 ज्या क्षेत्रांतील अध्ययन निष्पत्तीमध्ये विद्यार्थी मागे आढळतील त्या विद्यार्थ्यांसाठी गरजेनुसार कृती कार्यक्रमांची निर्मिती व अंमलबजावणी करावी.

04. ज्या अध्ययन निष्पत्तीमधील विद्यार्थ्यांची संपादणूक कमी आढळेल त्या घटकांचे पुनअध्यापन, सराव व उजळणी करून घ्यावी.

चाचणी घेण्यासाठी सूचना

१) तोंडी चाचणीसाठी काही पूरक साहित्य आवश्यकता असल्यास (उदा., वाचन उतारे, शब्दकार्ड, वाक्यकार्ड, वित्रे इ.) असे साहित्य पुरेशा संख्येने चाचणी सुरू करण्यापूर्वी तयार करून ठेवावे.

२) तोंडी चाचणी घेत असताना चित्र निरीक्षण, श्रवण, वाचन इ. कृर्तीसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ द्यावा. ३) तोंडी चाचणी ही लेखी चाचणीच्या दिवशीच पूर्ण होईल असे नियोजन करावे.

4) विद्यार्थ्यांची नेमकी संपादणूक लक्ष्यत येण्यासाठी पारदर्शी व तणावमुक्त वातावरणात चाचणी घेण्यात यावी.

५) वयोगटानुसार विद्यार्थ्यांच्या घराच्या/परिसर भाषेचा स्वीकार करावा.

6) तोंडी प्रश्नांचा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वैयक्तिक स्वरूपात घ्यावा व प्रतिसादानुसार लगेचच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्राप्त गुणांची नोंद दिलेल्या गुणनोंद तक्त्यात करावी, अर्धा गुण देऊ नये.

लेखी चाचणी घेण्यासाठी सूचना :

  1. ज्या विद्यार्थ्यांना आवश्यकता आहे, त्यांना प्रश्न समजावून सांगावा, मात्र उत्तराचा संकेत देऊ नये. विद्यार्थ्यांची नेमकी संपादणूक लक्षात येण्यासाठी पारदर्शी व तणावमुक्त वातावरणात चाचणी घेण्यात यावी.
  2. शाळेच्या मधल्या सुट्टीची वेळ झाल्यास अथवा मुले कंटाळली आहेत असे वाटल्यास थोडा वेळ थांबून नंतर उरलेली चाचणी घेण्यास हरकत नाही.
  3. लेखी चाचणीमध्ये उत्तरे लेखनासाठी आवश्यक जागा देण्यात आलेली आहे. संबंधित विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनी आपल्या वर्गात ही चाचणी घ्यावयाची आहे व ती तपासावयाची आहे.
  4. प्रत्येक विद्यार्थ्यांची सद्यःस्थितीमध्ये नेमकी संपादणूक कशी आहे, हे पाहणे हा मुख्य उद्देश चाचणी घेण्यामागे आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याचाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्यांचा दिव्यांग प्रकार लक्षात घेऊन शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांनी घ्यावा, आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.
  5. प्रात्यक्षिक / तोंडी आणि लेखी चाचणीचा गुणनोंदणी तक्ता चाचणीच्या सुरुवातीला देण्यात आलेला आहे. प्रश्ननिहाय गुणांची नोंद सदर तक्त्यात शिक्षकांनी करावयाची आहे. अर्धा गुण देऊ नये.
  6. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गुणांचे विश्लेषण करून वर्गस्तरावर गरजेनुरूप कृती कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी.
    धन्यवाद.
Share This Article