उत्तर :-
1) अपकीर्ती टाळावी.
2) सत्कीर्ती वाढवावी.
3) सत्याची वाट धरावी.
उत्तर :- १. पुण्यमार्ग सोडू नये. २. कुणावरही असत्याचा आळ आणू नये. ३. आपले ओझे इतरांवर लादू नये. ४. अभिमान बाळगू नये.
उत्तर :- गुण :- १. इतरांविषयी वाईट न बोलणे. २. गरजूंना मदत करणे. ३. जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास.
दोष :- १. बहिण-भावंडांसोबत मत्सर २. कुणावरही लवकर विश्वास ठेवणे. ३. अतिशय आळशी असणे.
उत्तर :-
(अ) तोंडाळांशी भांडू नये.
(आ) संतसंग खंडू नये.
उत्तर :-
(१) आळसात सूख मानू नये.
(२) परपीडा करू नये.
(३) सत्यमार्ग सोडू नये.
उत्तर :-
आशयसौंदर्य :- ‘उत्तमलक्षण’ या श्रीदासबोधातील एका समासामध्ये समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तीमत्वाची महत्वाची लक्षणे सांगितली आहेत. त्यांपैकी उपरोक्त ओवीमध्ये तीन लक्षणांचा उहापोह केला आहे.
काव्यसौंदर्य :- समाजात वावरताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात – लोकांचे मन मोडू नये. लोकांनी केलेली विनंती धुडकावू नये. उलट जनभावनांचा आदर करावा. तसेच वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये. अशी संपत्ती हे पापाचे धन असते. म्हणून सत्शील मार्गाने जीवन व्यतीत करावे. पुण्यमार्ग आचरावा. कधीही पुण्यमार्गाने जाण्याचे सोडू नये.
भाषिक वैशिष्ट्ये :- वरील ओवीमध्ये जनांसाठी खूप सुगम निरूपण केले आहे. ‘तोडू नये, जोडू नये, सोडू नये’ अशा सोप्या यमकांद्वारे संदेशामध्ये आवाहकता आली आहे. ओवीछंदाला साजेशी सुबोध भाषा वापरल्यामुळे जनमानसावर तत्त्व ठसवणे सुलभ झाले आहे. पापद्रव्य व पुण्यमार्ग यांतील विरोधाभास ठळकपणे उठून दिसतो. ओवीमध्ये प्रासादिकता हा गुण आढळतो.
‘उत्तमलक्षण’ या कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श गुणसंपन्न व्यक्तीची लक्षणे समजून सांगितली आहेत. त्यांपैकी एक लक्षण उपरोक्त चरणात सूचित केले आहे. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. माणसांमध्ये तो नित्य वावरत असतो. समूहामध्ये आदर्श व्यक्तीचे वर्तन कसे असावे, हे सांगताना संत रामदास म्हणतात – सभेमध्ये वावरताना, आपले मत मांडताना कधीही लाजू नये. स्पष्टपणे आपले म्हणणे मांडावे; परंतु त्याच वेळी बालिशपणे बोलून आपले हसे करून घेऊ नये. निरर्थक असे वक्तव्य व्यक्त करू नये. बाष्फळपणे बोलू नये. उत्तम पुरूषाचे एक मर्मग्राही लक्षण या ओवीतून मांडले आहे.
उत्तर :- ‘उत्तमलक्षण’ या ओवीमध्ये संत रामदास यांनी उत्तम व्यक्तीची लक्षणे विशद करताना आळस हा माणसाचा शत्रू आहे असे ठासून प्रतिपादिले आहे. ‘आळस’ हा माणसाच्या अंगी असलेला दुर्गुण आहे. त्यामुळे कार्य
करायला उत्साह राहत नाही व त्यामुळे बरीच कामे खोळंबून राहतात. ‘आळसे कार्यभाग नासतो ! या समर्थ रामदासांच्या उक्तीमध्ये हेच तत्व सांगितले आहे. माणसाच्या मनाला जे षड्विकार जडतात, त्यात ‘आळस’ हा एक विकार आहे. दैनंदिन कामांमध्ये आळसाला स्थान देऊ नये. आळसामुळे प्रगती खुंटते, भविष्य अंधारते. आळसामुळे मनाला जडत्व प्राप्त होते व माणूस नाकर्ता होतो. आळशी माणसाला समाजात मान मिळत नाही. म्हणून आळसात सूख मानू नये, समाधान मानू नये, असे समर्थ रामदास सांगतात.
उत्तर :-
संत रामदास यांच्या काळातील पद्यात आलेल्या शब्दांची व्हावें, आतां, सांगतों यांसारखी रूपे आताच्या काळात व्हावे, आता, सांगतो अशी वापरली जातात.
शब्दार्थ :-
उत्तम – आदर्श, गुणसंपन्न.
लक्षण – गुणवैशिष्ट्य.
श्रोतीं – ऐकणाऱ्या लोकांनो.
सावधान – सावध होणे, सजग होणे
उत्तम – उत्कृष्ट.
जेणें – ज्याने.
बाणे – बाणणे, अंगिकारणे, सवय लागणे. सर्वज्ञ – सारे जाणणारा. पुसल्याविण विचारल्याशिवाय. येकायेकी – एकदम, पटकन. जनीं – लोकांचे. आर्जव -विनंती
पापद्रव्य – पापाने (कपटाने) मिळवलेली संपत्ती.
जोडू नये – साठवू नये.
पुण्यमार्ग – चांगला रस्ता, सद्वर्तन.
कदाकाळी – कोणत्याही वेळी.
तोंडाळ वाटेल ते बोलणारा, भांडकुदळ.
वाचाळ – व्यर्थ बडबड करणारा.
तंडो नये – तंटा (भांडण ) करू नये.
संतसंग – सज्जन माणसाची संगत.
खंडू नये – तोडू नये.
अंतर्यामी – मनातून, हृदयातून.
आळस – काम न करणे.
चाहाडी – एखाद्याबद्दल वाईट सांगणे, आगलावेपणा.
कार्य – काम.
सभा – समूहाची बैठक.
बाष्कळपणा – बालिशपणा.
पैज – स्पर्धा, शर्यत.
होड – पैज.
परपीडा – दुसऱ्याला छळणे, दुःख देणे.
विश्वासघात बेइमानी.
व्यापकपण – (मनाचा) मोठेपणा.
पराधेन परावलंबी, दुसऱ्यावर विसंबणे.
वोझें – (स्वतःचा) भार.
कोणीयेकासी – कोणावरही.
सत्यमार्ग – खऱ्याचा मार्ग, सद्वर्तन.
असत्य – खोटेपणा.
पंथे – मार्गाने, वाटेने.
कदा – कधीही.
अभिमान – व्यर्थ गर्व.
अपकीर्ती – बेअब्रू, वाईट प्रसिद्धी.
सत्कीर्ति – चांगली प्रसिद्धी.
वाडवावी – वाढवावी.
विवेक – चांगल्या विचाराने.
विवेक – चांगल्या विचाराने.
दृढ – ठाम, मजबूत, ठोस.