उत्तर :- १. निखालस सेवक असतात २. वस्तूंना स्वच्छ राहण्याची आवड असते. ३. माणसासारखे लाडावून ठेवावे लागते.
उत्तर :- १. जीव २. मन
उत्तर :- १. वस्तू सुखावतात, वस्तू सेवक असतात. २. लाड करून घेतात, वस्तू मरण पावतात.
उत्तर :- वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत; कारण नंतरच्या काळातही त्या आपला स्नेह जिवंत ठेवणार आहेत.
उत्तर :- वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही; कारण त्यांचे आयुष्य संपते.
उत्तर :- ‘वस्तू’ या कवितेत कवी द. भा. धामणस्कर यांनी निर्जीव वस्तूनांही सजीव प्राणीमात्रांसारख्या भावना असतात, त्या
संवेदनशील असतात, हे बिंबवले आहे. तसेच वस्तूंना सहानुभूतीने समजून घ्यायला हवे व त्यांना प्रेमाने वागवायला हवे, असे प्रतिपादन केले आहे.
बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात व त्यांच्याशी निर्दयतेने वागतात. त्यांना कसेही हाताळतात. माणसांच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना वरील ओळींत कवी म्हणतात की कदाचित वस्तूंना जीव नसेलही आणि मनही नसेल, म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागवावे का? वस्तूंना मन आहे, असे समजून जर त्यांच्याशी आपण चांगले वर्तन केले तर वस्तूंना खूपआनंद होतो. त्या सुखावतात. आपल्या कुटुंबातील त्या घटक आहेत, अशी आपुलकी आपण दाखवली तर वस्तूही आपल्याला प्रेम व माया देतील.
मुक्तशैलीतल्या या रचनेमुळे कवींनी या ओळींतून रसिकांशी थेट संवाद साधला आहे. अगदी साध्या पण आवाहक शब्दांत मोठे तत्त्व बिंबवले आहे. वस्तू व माणूस यांतील स्नेहबंध आत्मीयतेने जपायला हवा, हा संदेश अगदी हळुवार पद्धतीने कवींनी दिला आहे.
उत्तर :- द. भा. धामणस्कर यांनी ‘वस्तू’ या कवितेमध्ये वस्तूंना कसे हाताळावे व जोपासावे याचा वस्तुपाठ देताना वस्तूंचे मानवीकरण केले आहे. बरीच माणसे वस्तूंना सजीव समजत नाहीत. त्यांनाही भावना असू शकतात, हे लक्षात घेत नाहीत. कवी म्हणतात की, त्यांनाही जीव आहे, मन आहे, असे आपण समजून त्यांच्याशी वागलो, तर वस्तूंना परमानंद होतो. वस्तूंना कसेही हाताळू नये. त्यांना एखाद्या लहान मुलांसारखे लाडावून मायेने हाताळावे. हाताळताना आपले
अस्वच्छ हात लावू नयेत. कारण वस्तूंनाही स्वच्छतेची आवड असते.
महात्मा गांधींचे वचन आहे की ‘स्वच्छता हाच परमेश्वर आहे’ म्हणून केवळ माणसाने स्वच्छ राहावे असे नाही. आपण
ज्या वस्तू वापरतो, त्यांनाही स्वच्छ राखता आले पाहिजे. ‘वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची’ या ओळीतून माणसाला
वस्तू हाताळण्याचा निकोप दृष्टिकोन दिलेला आहे.
उत्तर :-
पावसाळ्याचे दिवस होते. मी माझ्या स्कूटीने शाळेत जात होते. शाळा घरापासून बरीच दूर होती. पाऊस सुरू होता म्हणून मी रेनकोट घातला आणि गाडीवर बसून शाळेत जाण्यासाठी निघाले. आज शाळेत मराठी विषयाचा सराव पेपर होता. उशिर होऊ नये म्हणून मी पाऊस थांबण्याची वाट पाहिली नाही. पण हे काय, थोडे पुढे गेले की माझी गाडी अचानकच
बंद पडली. बऱ्याच दिवसांपासून मी गाडीची सर्विसिंग करण्यास टाळाटाळ केली होती. काही समस्या आलीच तर वेळेवर पाहू असं म्हणून एक एक दिवस टाळत गेले. त्यात त्याचा परिणाम असा झाला. वेळेवर गाडीची सर्विसिंग केली असती तर कदाचित असे झाले नसते.
उत्तर :- आमची वर्गखोली नव्यानेच सुंदर सुंदर चित्रांनी रेखाटली होती. वर्गात बसल्यावर ती चित्रं पाहून प्रसन्न वाटायचे पण, माझा वर्गमित्र पप्पू थोडा खोडकर होता. येता जाता तो त्या चित्रांना हात लावायचा. एकदा तर त्याने कमालच केली. ओले हात भिंतीला पुसत असताना मी त्याला पाहिले. मला राहवले नाही. सरांना सांगितले तर सर त्याला शिक्षा देतील म्हणून मीच त्याला समजावून सांगण्याचे ठरवले.
उत्तर :-
या बाबतीत मी माझ्या आजी-आजोबांसोबत चर्चा केली असता मला पुढील वस्तूंची माहिती मिळाली.
(१) पाटा-वरवंटा :-पुरणाची दाळ व इतर भिजवलेल्या दाळी वाटण्यासाठी.
(२) जातं :- गहू, ज्वारी, दाळी इत्यादी धान्य दळण्यासाठी.
(३) रेडिओ :- बातम्या, गाणी व इतर कार्यक्रम ऐकण्यासाठी.
(४) पखाल :- पाणवठ्यावरील पाणी पखालीमध्ये भरून ती म्हैशीच्या किंवा इतर प्राण्यांच्या पाठीवर ठेवून पाणी आणण्यासाठी.
(५)गंगाळ :- तांब्याचे किंवा पितळीचे गंगाळ गोलाकार आकाराचे असायचे. त्याला दोन्ही बाजूंनी धरण्यासाठी दोन कड्या असायच्या. अंघोळ करण्यासाठी गंगाळाचा उपयोग व्हायचा.
माझे वडील बंधु प्रत्येक वस्तू काळजीपूर्वक हाताळायचे. कधीकधी मलाही नवल वाटायचे की या निर्जिव वस्तूंची हे इतकी काळजी का घेतात! उत्सुकतेपोटी मी त्यांच्याशी या विषयावर संवाद केला तो पुढीलप्रमाणे.
मी : दादा, मला तुमच्याशी थोडं बोलायचं.
दादा : थोडं थांब. झाडांना पाणी देण्याची वेळ झाली.
मी : ठीक आहे दादा. तुम्ही आधी झाडांना पाणी द्या. नंतर बोलूत आपण
दादा : (पाणी देऊन आल्यावर) काय म्हणतेस बेटा !
मी : दादा, तुम्ही दररोज झाडांना पाणी देतांना गाणं का गुणगुणता ?
मी : पण दादा ते कसं शक्य आहे. झाडांना थोडंच ऐकू येतं ?
दादा: तसं नाही बेटा. वनस्पती शास्त्रज्ञांनी शोध लावला की झाडांना पाणी देतांना गाणी गुणगुणली तर त्यांची वाढ जास्त गतीने होते. इतकंच नाही तर आपण कोणतेही काम करत असताना ते काम आनंदात व प्रसन्न मनाने केले तर सगळीकडे सकारात्मक ऊर्जा (पॉजिटिव एनर्जी) पसरली जाते.
मी : मला आज तुम्हाला हेच विचारायचे होते. तुम्ही तुमच्या जवळच्या प्रत्येक वस्तू अतिशय काळजीपूर्वक् हाताळता. त्यांची लहान मुलांप्रमाणे काळजी घेता. मला तुम्हाला असे करताना पाहून खूप नवल वाटते.
दादा : हो बेटा. आपल्या जवळच्या प्रत्येक वस्तू एकप्रकारे आपली सेवाच करत असतात. त्यामुळे त्यांची योग्य प्रकारे काळजी घेणे ही आपली जबाबदारी असते. यानंतर तू देखील प्रत्येक वस्तूची अशीच काळजी घेत जा.
मी : ठीक आहे दादा. मी पण आजपासून प्रत्येक वस्तू काळजीपूर्वक वापरेल. तिचा योग्य प्रकारे सांभाळ करेल.
उत्तर :- घरात कुणाच्यातरी हुंदक्यांचा आवाज ऐकू येत होता. आवाज अडगळीच्या खोलीतून येत होता. डोकावून पाहिले तर रद्दी पेपर ओले झालेले दिसले आणि नवल म्हणजे मी त्यांच्या जवळ जाताच ते माझ्याशी बोलायला लागले.
रद्दी : वेळेसोबतच आमची किंमत पण कमी होते.
रद्दी : तुमच्या घरी येतो त्या दिवशी तुम्ही आम्हाला जास्त पैसे देऊन विकत घेता. आम्हाला प्रेमाने हातात घेऊन आमच्यातील शब्दन् शब्द वाचता. आम्हाला पाणी लागू नये, आम्ही खराब होवू नये, फाटू नये म्हणून काळजी घेता. पण नंतर काही दिवसांनी आमचीच कवडीमोल किमतीने विक्री करता.
मी : हो खरंच. तुम्ही म्हणत आहात ते मला पटत आहे.
रद्दी : खूप वाईट वाटते आम्हाला. आम्ही साधा कागद असतो. नंतर आमचा पेपर होतो. छापखान्यात आमचा दुसरा जन्म होतो तेव्हा आम्ही खूप आनंदी असतो. आम्हाला तेव्हा मान असतो. सगळेजण आमची काळजी घेतात. पण नंतर आम्हाला रद्दीच्या रूपात विकले जाते.
मी : हो तुमचे खरे आहे. पण हे तर चालतच राहाणार. प्रत्येक वस्तूचीच नव्हे तर व्यक्तीची जागा देखील बदलत असते. त्यामुळे आपण गर्व करू नये. तुम्ही रद्दी म्हणून विकल्या गेलात तरी तुम्ही जिथे जाल तिथे तुम्ही इतरांच्या उपयोगीच पडता. यातच जीवनाचा आनंद आहे.
रद्दी : हो खरंच तुमचे म्हणणे पण बरोबर आहे. पटले मला तुमचे म्हणणे. कुठेही जा पण इतरांच्या उपयोगात येणे हेच महत्त्वाचे.
कंदील : काय गं विजेरी काय करत आहेस ?
विजेरी : काय करणार. वीज गेल्यामुळे मीच प्रकाश देण्याचे काम करत आहे.
कंदील : आगं मग चांगलं आहे ना. ते तर आपलं कामच आहे.
विजेरी : हो पण जशी मी आले तसे तुझे काम तर कमीच झाले.
विजेरी : हो पण तुला पेटवने तसे अवघडच. मी मात्र एका बटणावरच लख्ख प्रकाश देते.
कंदील : होगं पण रात्रीच्या वेळी तुझ्या लख्ख प्रकाशापेक्षा माझा शांत मिणमिणता प्रकाशच लोकांना जास्त आवडतो.
विजेरी : हो तुझे पण बरोबर आहे. तू माझ्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे पाहिले. तू लोकांची खूप सेवा केली. मी तर आता आले.
कंदील : आगं आपल्या दोघांचेही काम एकच आहे. अंधारात प्रकाश देवून आपण लोकांची सेवाच करतो. त्यामुळे कुणीच मोठं नाही आणि कुणीच लहान नाही.
विजेरी : हो कंदील दादा तुझे बोलणे बरोबर आहे.
- टर्न अँड टॉक ऍक्टिविटी: एक प्रभावी शिक्षण पद्धत
- शिक्षकांस पाठटाचण लिहण्यास मदत करणारे Ai टूल्स
- शिक्षकांसाठी सर्वोत्तम AI टेक्स्ट-टू-स्पीच टूल्स
- मुलांसाठी सर्वोत्तम संशोधन वेबसाईट्स
- शिक्षकांसाठी Ai prompt लिहण्यासाठी ChatGPT वापरण्याच्या ४ महत्वाच्या युक्त्या