८. वाट पाहताना स्वाध्याय मराठी इयत्ता १० वी

E-Swadhyay
5 Min Read
आवडल तर शेअर करा.

उत्तर :-
(१) अंगणातले हजारी मोगऱ्याचे झाड
(२) सकाळी सकाळी शनिवारवाड्यात जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुले
(३) माठातले वाळा घातलेले पाणी
(४) आई – आत्यांची कुरडया – पापड्यांची घाई
(५) अंगणभर पसरलेली वाळवणे
(६) कैरीची डाळ आणि पन्हे

उत्तर :-

१. न पाहिलेले माणसे २. न जुळणाऱ्या थक्क करणाऱ्या अनेक गोष्टी ३. न पाहिलेले देश ४. न अनुभवलेले प्रसंग

उत्तर :-

१. माणसामाणसांमध्ये भावनेची नाती निर्माण करणारे पूल आपल्या मुलाला दाखवतो.
२. म्हातारीचे वाट पाहणे सुखाचे करणारी रीत जाणतो.
३. नुसता पत्रे पोहोचवणारा सरकारी नोकर नाही ; भला माणूस आहे.

उत्तर :-

(१) कोकिळाचा कुहुकुहु आवाज
(२) परीक्षेनंतरची सुट्टी
(३) गोष्टी – कवितांची पुस्तके
(४) उंबराच्या झाडावर बसणारा पोपटांचा थवा
(५) मनात जाग्या होणाऱ्या कविता .

उत्तर : आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं, कारण पहाटे कहकह ऐकू यावा, ही रात्री झोपताना बाळगलेली इच्छा पहाटे पहाटे पूर्ण होई .

उत्तर : म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं, कारण दूर परगावी राहणारा आपला मुलगा आपली आठवण काढतो, आपल्याला तो त्याच्याकडे नेणार आहे. या कल्पनेने तिचे मन सुखायचे .

उत्तर : पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेड लावायचा, कारण पुस्तकातून भाषेची शक्ती, लेखकांच्या प्रतिभेची शक्ती समजू लागली होती

उत्तर : पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचतो कारण त्या म्हातारीला पुत्रभेटीचा आनंद मिळावा आणि तिचे शेवटचे दिवस समाधानात जावेत, अशी पोस्टमनची इच्छा होती .

उत्तर :- १) व्यक्तीशी मैत्री

व्यक्तीशी मैत्री केली जाते आपण मनात येईल तेव्हा मित्र मैत्रिणींना हाक मारतो. आपल्या मनात येईल तेव्हा भेटून त्यांच्याशी बोलतो.

२) कवितेशी मैत्री

कवितेशी मैत्री झाली, तर कविता मात्र आपण बोलावू तेव्हा हमखास येतेच असे नाही. ती तिला हवं तेव्हाच
आपल्याकडे येते. आपल्याला तिच्या येण्याची वाट पाहत बसावं लागतं .

उत्तर :- १. वाट पाहणे प्रक्रियेतील समाविष्ट गोष्टी
दुःख
काळजी
भीती

२. वाट पाहणे प्रक्रियेतून माणसाने शिकायच्या गोष्टी
संयम बाळगणे
धीर धरणे
विश्वास घट्ट करणे

३. वाट पाहण्याचे फायदे
सुखाची चव वाढते
यशाची गोडी वाढते
प्रेमातील, मायेतील तृप्ती वाढते.

उत्तर : माणूस म्हटला की त्याला जोडून ‘आशा’ ही येतेच. ही आशा म्हणजेच एखाद्या गोष्टीची वाट पाहणे. प्रस्तुत पाठात
लेखिका अरुणा ढेरे यांनी अशाच वाट पाहण्याच्या विविध अनुभवांचे वर्णन केले आहे. कोकिळेचा आवाज, सुट्टीत वाचायला मिळणारी पुस्तकं, पोपटांचे थवे, सुचणाऱ्या कविता, लाडकी आत्या अशा अनेक लहान मोठ्या गोष्टींची वाट पाहण्याचे हे अनुभव मनाला भिडतात. माणसाला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या गोष्टीची वाट पाहावीच लागते .

या वाट पाहण्यामुळे होणारी तगमग, होणारा त्रास, मिळणारे दुःख या सर्व गोष्टी तो अनुभवतो. त्यानंतर जेव्हा ती गोष्ट
मिळते तेव्हा मिळणारा आनंद हा विशेष मोलाचा असतो. प्रस्तुत पाठात लेखिकेने वाट पाहण्याचे फायदे, त्यातून आपण शिकत असलेल्या गोष्टी मांडल्या आहेत . पावसाची वाट पाहणारा शेतकरी, विठ्दर्शनाची वाट पाहणारे वारकरी, मुलाच्या पत्राची वाट पाहणारी म्हातारी अशा सुंदर उदाहरणातून वेगवेगळे अनुभव मांडले. त्यामुळेच, या पाठाला दिलेले ‘ वाट पाहताना ‘ हे नाव अतिशय योग्य आहे.

उत्तर : वाड्या – वस्त्यांवर पत्र वाटत आयुष्य घालवणारा पोस्टमन पत्रांद्वारे माणसांपर्यंत सुख पोहोचवत होता. त्याने एका अंध म्हातारीच्या जीवनाचा आधार सांभाळून ठेवला होता . म्हातारीचा दूर राहणारा मुलगा आपल्या आईशी संपर्कही करत नसे . तो येईल, त्याची पत्र मिळतील या एका वेड्या आशेवर म्हातारी जिवंत होती. म्हातारीला आनंद वाटावा यासाठी पोस्टमन म्हातारीच्या मुलानी कधीही न पाठवलेली पत्रे वाचून दाखवतो. तो म्हातारीच्या जीवनात सुखाचे रंग भरत असतो एखादे सत्य जर समोरच्या व्यक्तीच्या जगण्याचा आधार हिसकावून घेणारे असेल, तर ते त्या व्यक्तीला न सागंणे योग्य असा विचार त्या पोस्टमनने केला असावा . पोस्टमनच्या त्या कृतीमुळे म्हातारीचे आयुष्य मायेच्या ओलाव्याने भरून जात होते. सुखकर होत होते. त्यामुळे पोस्टमनने केलेली ही युक्ती अतिशय योग्य वाटते.

उत्तर : वाट पाहण्यामध्ये दुःख, आतुरता, कळकळ, अपेक्षा, तळमळ अशा अनेक भावनांचे मिश्रण असते. या सर्व भावना सुखदायी असतातच असे नाही, पण तरीही हे वाट पाहणं जीवनात अनेक गोष्टी शिकवून जातं . ज्या गोष्टीची व्यक्तीची आपण वाट पाहत आहोत त्या गोष्टीचे, त्या व्यक्तीचे मोल आपल्या लक्षात येते

अनेकवेळा सहजपणे मिळालेल्या गोष्टींची, सुखाची खरी किंमत आपल्याला जाणवत नाही. जेव्हा तीच गोष्ट किंवा तेच सुख वाट पाहिल्यानंतर मिळते, तेव्हा त्याची खरी किंमत, खरे मूल्य आपल्याला जाणवते. त्या गोष्टीसाठी तडफड सहन केल्यानेच तिचे मोल समजते . त्यामुळे वाट पाहणे एरवी सुखाची गोष्ट नसली तरी अनेक गोष्टींचे मोल किती आहे, याची जाणीव करून देते.

Share This Article