उत्तर :- १. फुटबॉल व हॉलीबॉल या खेळाची नॅशनल चॅम्पियनशिप मिळवली.
२. खेळाशी जोडलेली राहण्यासाठी CISF मध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला.
उत्तर :-
१) भाईसाब यांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मानला. :- वडीलधाऱ्या व्यक्तीचा आदर
२) चोरांना लाथा बुक्क्यांचा प्रसाद दिला :- धाडसी वृत्ती
३) उठता बसता खाता- केवळ एव्हरेस्टचाच विचार करू लागली होती :- ध्येयवादी
४) ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला ऑक्सीजन सिलेंडर अरुणिमाने वापरला : – व्यवहारी
उत्तर :-
१) एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला :- बचेंद्री पाल
२) सर्वात मोठा मोटिव्हेटर :- स्वतःच
३) अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे :- भाईसाब
४) फुटबॉल आणि हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन :- अरुणिमा
उत्तर :-१) ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यातून मी तावून-सुलाखून निघत होते.
२) उजव्या पायाची हाडे एकत्र येण्यासाठी त्यात स्टीलचा प्रॉब्लेम रॉड घातलेला होता, त्यावर थोडा जरी दाब दिला तरी तीव्र वेदनांचे झटके बसत.
३) ती अपंग, त्यात मुलगी, म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला.
४) आपलं मन जसं सांगत अगदी तसेच आपले शरीर वागतं.
५)मी अशी नि तशी मरणारच होती तर मग माझ्या यशाचे पुरावे असणे अत्यावश्यकच होते.
उत्तर :- अ) शरीराला जखमा झाल्यामुळे बहुदा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय.
समाजातील बहुसंख्य लोक मनाने दुबळी असतात त्यामुळे अरुणिमाच्या अपार धाडसावर फारसा विश्वास बसत नाही. शरीरावर झालेल्या अपघातामुळे तिचा मानसिक तोल ढळून वेडाच्या भरात तिच्या हातून असे कृत्य घडले असावे अशी शंका अनेकांच्या मनात आली असणार.
२) अरुणिमाकडे प्रवासाचे तिकीट नव्हते म्हणून तिने रेल्वेतून उडी मारली.
अरुणिमाने तिकीट काढले नसणारच त्यामुळे टी.सी.च्या नजरेतून सुटण्याच्या प्रयत्नात तिने गाडीतून उडी मारली असावी, अशी शंका काही जणांना येते. अलीकडे प्रामाणिकपणा, सज्जनपणावरील समाजाचा विश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळे कोणाच्याही चांगल्या कृतीतून वाईट अर्थ काढण्याची सवय समाजाला लागलेली आहे हेच या प्रतिक्रियांवरून दिसून येते.
उत्तर :- १) पराकोटीचे धैर्य २) अमाप सहनशक्ती असणारी ३) जबरदस्त आत्मविश्वास असलेली ४) अन्यायाविरुद्ध लढणारी ५) ध्येयवादी ६) जिद्दी
उत्तर :-
१) नॅशनल राष्ट्रीय
२) स्पॉन्सरशिप – प्रायोजकत्व
३) डेस्टिनी – नियती
४) कॅम्प – छावणी
५) डिस्चार्ज – मोकळीक, पाठवणी
६) हॉस्पिटल – रुग्णालय
१) Now or Never!
उत्तर : आता नाही तर कधीच नाही!
२) Fortune favours the braves.
उत्तर : शूर माणसाला नशीब नेहमी साथ देते.
उत्तर :
अ) धोकादायक पर्वत चढणे.
आ) ध्येयापासून दूर लोटू पाहणारे प्रशिक्षणातील कष्ट.
इ) उजव्या पायातल्या रॉड मुळे तो पाय जरा जरी दाबला तरी असंख्य कळा येत.
ई) अरुणिमाची अवस्था पाहून शेरपाचा निश्चय डळमळायचा.
अ) प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण असतोच
गुण-अवगुण
उत्तर :- प्रत्येक व्यक्तीत काही ना काही अवगुण असतोच असे नाही.
आ) सूर्योदयाच्या वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात.
सुर्योदय – सुर्यास्त
उत्तर :- सूर्यास्ताच्या वेळी ही सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात.
इ) खालील प्रश्नांची संक्षिप्त असावीत.
संक्षिप्त – सविस्तर
उत्तरे :-खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहू नका.
ई) ४) प्रयत्नांने बिकट वाट पार करता येते.
बिकट – सोपी
प्रयत्नांने सोपी वाटही पार करता येते.
१) सायरा आज खूप खुश होती.
उत्तर :- होती
२) अनुजाने सुटकेचा नि:श्वास टाकला.
उत्तर · टाकला
३) मित्राने दिलेले गोष्टीचे पुस्तक अब्दूलला खूप आवडले.
उत्तर :- आवडले.
४) जॉनला नवीन कल्पना सुचली.
उत्तर – सुचली
उत्तर :-
उत्तर :- दहावी-बारावीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे किंवा एखादा पेपर कठीण गेला म्हणून विद्यार्थी आत्महत्या करतात, अशा बातम्या अनेकदा ऐकू येतात. ते साफ चूक आहे. त्यांना वाटते नापास झाल्यामुळे नामुष्की येते. तोंड दाखवायला जागा राहत नाही. पण खरोखरच परीक्षेतले अपयश ही नामुष्की असते काय, याबाबत थोडा विचार केला पाहिजे. आपण खूप गुण मिळण्याला परीक्षेत यश मानतो. पण हे बरोबर आहे काय ? गुण महत्वाचे नसतात ; ज्ञान महत्त्वाचे असते. गुण हे साधन असते, तर ज्ञान हे साध्य असते; आपले ध्येय असते.
आपण गुणांना महत्त्व जास्त देतो. इथेच खरा घोटाळा निर्माण होतो. आपले ध्येय हे आपले साध्य असल्यामुळे ते जास्तीत जास्त उच्च दर्जाचे राखले पाहिजे. ते मिळवताना अपयश आले तर पुन्हा प्रयत्न करता येतो. परंतु ध्येय कमी दर्जाचे असले तर आपण कितीही मोठे यश मिळवले, तरी ते यश कमी दर्जाचे असते. याचा साधा अर्थ असा की, ध्येय प्राप्त करताना आलेले अपयश हे तात्पुरते असते. त्याने खचून जाता कामा नये, किंबहुना ती नामुष्की सुद्धा नसते. उच्च ध्येय निवडता आले नाही तर मात्र ते अपयश असते.
कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नसते. एखाद्याला नृत्य आवडते. एखाद्याला गायला आवडते. एखाद्याला दुसऱ्याला मदत करायला आवडते. तर कोणाला समाजातील घडामोडींशी दोस्ती करणे आवडते. आपल्यातला असा वैशिष्ट्यपूर्ण गुण कोणता आहे, हे आपण शोधले पाहिजे. या गुणाची जोपासना केली पाहिजे. मग आपल्या हातून आपोआपच लोकोत्तर कामगिरी पार पडेल.
अरुणिमाने नेमके हेच केले. खरेतर अपंग बनलेली अरुणिमा आयुष्यात काहीच करू शकली नसती. पण तिने जिद्दीने
स्वतःमधला वेगळा गुण ओळखला. स्वतःचे सामर्थ्य शोधले आणि अशक्य वाटणारी कामगिरी पार पाडली. प्रत्येक व्यक्तीमध्ये अरुणिमा असतेच. फक्त त्या अरुणिमाचा आपण शोध घेतला पाहिजे. जीवनाचा हाच महामंत्र आहे.
उत्तर :- आपण दिवसभर कोणती ना कोणती कृती करीत असतो. त्या वेळी आपल्या मनात कोणता तरी हेतू असतो. हेतूशिवाय कोणतीही कृती अशक्य असते. आपला हेतू म्हणजेच आपले ध्येय होय. खूप पैसे मिळवणे हे ज्याचे आयुष्यातले सर्वोच्च ध्येय असते, तो माणूस सतत पैसे मिळवण्याचाच विचार करीत राहील कळत-नकळत पैसे मिळवून देण्याच्या कृतीकडेच ओढला जाईल. म्हणजे आपले आपल्या मनातले ध्येयच खूप महत्त्वाचे असते. तेच आपल्या जीवनाची दिशा ठरवीत असते.
म्हणून आपण आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. ते नीट समजून घेतले पाहिजे. पर्वतांमध्ये एव्हरेस्ट जसा सर्वांत जास्त उंच आहे, तसेच आपले ध्येय आयुष्यातील सर्वांत जास्त उंच, सर्वांत जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. ती गोष्ट आपल्या मनातील एव्हरेस्टच होय. या एव्हरेस्टचा आपण शोध घेतला पाहिजे. तो सर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
CISF, किंवा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारतातील एक निमलष्करी दल आहे जे देशभरातील विविध औद्योगिक प्रतिष्ठान, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSUs) आणि इतर गंभीर पायाभूत सुविधांची सुरक्षा आणि संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार आहे. 1969 मध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कायद्यांतर्गत त्याची स्थापना करण्यात आली.
विमानतळ, बंदरे, पॉवर प्लांट, तेल शुद्धीकरण कारखाने, स्टील प्लांट, खाणी आणि इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांसह नियुक्त आस्थापनांना सुरक्षा आणि संरक्षण प्रदान करणे ही CISF ची प्राथमिक भूमिका आहे. हे दल काही सरकारी इमारती आणि प्रतिष्ठानांनाही सुरक्षा पुरवते.
CISF हे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. सुरक्षा, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर संबंधित कौशल्यांमध्ये प्रशिक्षित कर्मचार्यांसह हे बहु-कुशल आणि बहु-आयामी बल म्हणून कार्य करते. नैसर्गिक आपत्ती आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव कार्यातही हे दल मदत करते.
CISF कर्मचारी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी, लोक आणि मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि सुरक्षा धोके आणि आपत्कालीन परिस्थितींना प्रतिसाद देण्यासाठी जबाबदार असतात. त्यांची कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडण्यासाठी त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रे, पाळत ठेवणारी यंत्रणा आणि दळणवळणाची साधने आहेत.
त्याच्या मुख्य सुरक्षा कार्यांव्यतिरिक्त, CISF खाजगी संस्था आणि उद्योगांना त्यांच्या सुरक्षा पायाभूत सुविधा आणि पद्धती सुधारण्यासाठी सल्ला सेवा देखील प्रदान करते. भारतातील महत्त्वपूर्ण प्रतिष्ठानांची सुरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी या दलाने व्यावसायिकता, शिस्त आणि वचनबद्धतेसाठी प्रतिष्ठा प्राप्त केली आहे.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) हा भारतातील स्वायत्त सार्वजनिक वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांचा समूह आहे. AIIMS संस्था देशातील प्रमुख वैद्यकीय संस्था म्हणून ओळखल्या जातात आणि वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि रूग्ण सेवेतील त्यांच्या उत्कृष्टतेसाठी जागतिक स्तरावर ओळखल्या जातात.
AIIMS ची स्थापना 1956 मध्ये झाली आणि पहिली AIIMS संस्था नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आली. वर्षानुवर्षे, जोधपूर, भोपाळ, पाटणा, ऋषिकेश, रायपूर, भुवनेश्वर, नागपूर, गुंटूर आणि बिबीनगर यासह भारतातील विविध शहरांमध्ये अनेक AIIMS संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत.
AIIMS विविध वैद्यकीय आणि आरोग्य सेवा क्षेत्रात अंडरग्रेजुएट (MBBS), पदव्युत्तर आणि डॉक्टरेट प्रोग्राम ऑफर करते. एमबीबीएस प्रोग्रामसाठी प्रवेश प्रक्रिया अत्यंत स्पर्धात्मक आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. AIIMS संस्था रूग्णांना विशेष वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया सेवा देखील देतात आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी ओळखल्या जातात.
वैद्यकीय शिक्षण आणि रूग्ण सेवेव्यतिरिक्त, AIIMS संस्था वैद्यकीय संशोधनात सक्रियपणे सहभागी आहेत आणि वैज्ञानिक प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतात. ते मूलभूत विज्ञान, क्लिनिकल औषध, महामारीविज्ञान, सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांमध्ये संशोधन करतात.
भारतातील AIIMS संस्थांना भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून अर्थसहाय्य दिले जाते आणि त्यांचे संचालन केले जाते. त्यांच्याकडे प्रख्यात डॉक्टर, संशोधक आणि वैद्यकीय व्यावसायिकांचा समावेश असलेली एक मजबूत फॅकल्टी आहे जी देशातील आरोग्यसेवा आणि वैद्यकीय शिक्षणाच्या प्रगतीसाठी समर्पित आहेत.
एकंदरीत, AIIMS ही भारतातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये अत्यंत प्रतिष्ठित संस्था म्हणून ओळखली जाते, जी तिच्या अपवादात्मक आरोग्य सेवा, अत्याधुनिक संशोधन आणि प्रशिक्षित वैद्यकीय व्यावसायिकांच्या निर्मितीसाठी ओळखली जाते.
(१) खालील भाव व्यक्त करणारे वाक्य उताऱ्यातून शोधून लिहा.
(अ) वृक्ष बहरू लागले आहेत. वृक्ष-पर्णांनी अंग धरले आहे.
(आ) नदी नाल्यात भरपूर पाणी आहे. करंगळीची सोंड झाली आहे..
(अ) पाणी समजूतदार वाटते :- पाणी शांतपणे वाहते, तेव्हा ते जणू काही कोणतेही नुकसान होऊ नये, याची काळजीच घेत असावे असा भास होतो. म्हणून ते त्या वेळी समजूतदार वाटते.
(आ) पाणी क्रूर वाटते :- नदीकाठावरच्या गरिबांच्या झोपड्या उध्वस्त करणाऱ्या पुराच्या पाण्याला पाहिल्यावर त्याच्या मनात त्या गरीब, दुबळ्या माणसांबद्दल कणवच नसावी, अशी भावना मनात जागी होते आणि ते पाणी स्वभावाने क्रूर असावे, असे वाटू लागते.
१. आकाश ढगांनी पूर्णपणे झाकून गेलेले असते.
२. संपूर्ण अवकाश पाणावलेला असतो.
३. अधूनमधून पाऊस कोसळत असतो.
४. सगळीकडे हिरवीगार वनराजी पसरलेली असते.
५. नदी नाल्यातून पाणी ओसंडून वाहत असते.
६. नावे पाणी उसळत घुसळत फेसाळत वाहते.
उत्तर :- १. उसळत, घुसळत, फेसाळत धावणे २. काठ ओलांडून ओसंडून वाहणे ३. संथपणे धिरगंभीरपणे वाहणे. ४. बेफाम होऊन सगळे बुडवत धावणे.
पावसाळ्यात सर्वत्र पाण्याचे साम्राज्य असते. जिकडे तिकडे पाणीच पाणी असते. अधूनमधून पाऊस कोसळत असतो. त्यामुळे नदीनाल्यांतून पाणी ओसंडून वाहत असते. वाहताना ते कधी काठाला धडकते, तर कधी काठावर चढते. यावरून
पाण्याचा धसमुसळेपणा जाणवतो. काही काही ठिकाणी ते इतके संथपणे वाहते की वाटावे जणू काही ते आपला दरारा
दाखवत आहे.
मोठ्या पुलांखालून पाणी वाहत जाते, तेव्हा ते समजूतदार, शहाण्या मुलासारखे वाटते. कधी कधी ते काठावरच्या गरिबांच्या झोपड्या उध्वस्त करते. अशा वेळी ते स्वभावाने खूप क्रूर असावे, असे मनात येते. कधी कधी ते झाडावर चढते, गच्चीवर लोळते, घाटाला बुडवते, वाटेला तुडवते. अशा वेळी त्याच्या स्वभावातला अवखळपणा जाणवत राहतो. असे पाण्याच्या स्वभावाचे अनेक पैलू या उताऱ्यातून जाणवत राहतात.
खूप महत्त्वाचा आणि सोपा उपाय म्हणजे जमिनीच्या उतारावर आडवे चर खोदणे. त्या चरांमध्येच वाढणारी झाडे लावावीत. पाणी थबकत थबकत वाहत राहिल्यामुळे ते जमिनीत भरपूर मूरते पाझर तलाव खोदल्यावरसुद्धा पाणी जमिनीत भरपूर मुरते. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे झाडे लावल्यास झाडांची मुळे जमिनीत पाणी धरून ठेवतात.
अशा उपायांनी जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते. विहिरींमध्ये वर्षभर पाणी राहते. पाणी साठवण्यासाठी जमिनीत
खड्डेसुद्धा खोदतात. या खड्ड्यांतील पाणी जमिनीत मुरून जाऊ नये म्हणून उपाययोजना करतात. त्यामुळे पावसाळ्यानंतर जवळपासच्या झाडझाडोऱ्याला व गुरांना पाणी देता येते. अशा प्रकारचे वेगवेगळे उपाय योजून पाण्याची गरज भागवता येते.
- टर्न अँड टॉक ऍक्टिविटी: एक प्रभावी शिक्षण पद्धत
- शिक्षकांस पाठटाचण लिहण्यास मदत करणारे Ai टूल्स
- शिक्षकांसाठी सर्वोत्तम AI टेक्स्ट-टू-स्पीच टूल्स
- मुलांसाठी सर्वोत्तम संशोधन वेबसाईट्स
- शिक्षकांसाठी Ai prompt लिहण्यासाठी ChatGPT वापरण्याच्या ४ महत्वाच्या युक्त्या