१४. काळे केस स्वाध्याय इयत्ता दहावी मराठी

E-Swadhyay
6 Min Read
आवडल तर शेअर करा.

उत्तर :-

१. भिंतीच्या व कौलारांच्या उंचसखल व उभ्या आडव्या रांगा समोर दिसतात.
२. कधी कधी पाऊस रिमझिम असतो.

३. पावसाळ्यात दिशा धूसर बनतात .
४. कधी कधी पाऊस धो धो कोसळतो.

उत्तर :- १. नव्या नव्या कल्पना २. अर्धवट सुचलेल्या कल्पनांच्या आकृती पूर्ण करण्यासाठी आवश्यक शब्द

उत्त्तर : कारण लेखकांचे केस काळे होते आणि प्रश्न विचारणायाचे केस पांढरे झाले होते, हे लेखकांच्या लक्षात आले.

उत्तर : – कारण तो माणूस स्वतःच्या केसांचा पांढरेपणा लपवण्यात अयशस्वी ठरत होता आणि लेखकांकडून केसांचा पांढरेपणा लपवण्याची युक्ती मिळत असल्यास हवी होती.

उत्तर :-

अ ) केस भर विषयांतर : – अगदी थोडे विषयांतर
आ ) केसांत पांढरं पडण्याची लागण : – केस पांढरे होणे.
इ ) प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड : प्रकाशामुळे चमकणारे झाड

उत्तर :-

वाक्प्रचार अर्थ
अ ) गुडघे टेकणे . शरण येणे .
आ ) खनपटीला बसणे सारखे विचारत राहणे.
इ ) तगादा लावणे. पुन्हा पुन्हा विचारणे .
ई ) निकाल लागणे. संपवणे
उ ) पिच्छा पुरवणे एखाद्या गोष्टीचा सतत आग्रह धरणे .

१) माधुरी सतार वाजवण्यात निष्णात आहे
२ ) झिलई दिली की जुनी भांडी चकाकतात .
३ ) मधुकर नित्यनेमाने व्यायाम करतो .
४ ) आपण कधी लहरी वागू नये .
५ ) मनूने आईकडे खाऊ साठी तगादा लावला .

उत्तर :- अ ) नव्या कल्पना कारंजाच्या तुषारांप्रमाणे उडू लागतात .
उपमा अलंकार
आ ) तो देखावा मुक्या शब्दांनी बोलतो.
चेतनगुणोक्ती अलंकार
इ ) कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी असते.
उपमा अलंकार

अ) मातीच्या ढिगात सुख -दु:खांचे माणिकमोती आढळतात
परस्परविरोधी शब्द : सुख – दु:ख
आ ) त्या प्रश्नातली गर्भित प्रशंसा उघड असते .
परस्परविरोधी शब्द : गर्भित – उघड
इ) स्तुती – निंदेची पर्वा न करणारा मी .
परस्परविरोधी शब्द : स्तुती – निंदा
ई) प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं.
परस्परविरोधी शब्द : प्रश्न – उत्तर

उत्तर :- अ ) अवरोही X आरोह
आ ) अल्पायुषी X दीर्घायुषी
इ ) सजातीय x विजातीय
ई ) दुमत X एकमत
उ ) नापीक X सुपीक

उत्तर : खनपटीला बसलेल्या गृहस्थाशी लेखकांनी त्याची थट्टा करीत केसांच्या रंगाबद्दल चर्चा केली. या चर्चेमुळे माझे एक ठाम मत झाले आहे. लोक आपले वय लपवण्यासाठी, आपण म्हातारे झालेलो नाही, आपण अजूनही तरुणच आहोत, हे दाखवण्यासाठी केसांना कलप लावतात. वास्तविक, दिवसागणिक आपले वय वाढत जाणारच. वाढत्या वयाचा आपल्या शरीरावर परिणाम होणारच. हे सर्व माणसे कधीही टाळू शकत नाहीत. माणूस निसर्गाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही.

ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन माणसाने एखादया क्षेत्रात आपले नाव प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याची सुरुवात शालेय जीवनापासूनच केली पाहिजे. आपली आवडनिवड बारकाईने तपासून पाहिली पाहिजे. आपली कुवत काय आहे, आपल्याला कोणती गोष्ट झेपू शकते, आपण कशात प्रगती करू शकतो, याचा शोध घ्यायला सुरुवात केली पाहिजे. त्यानुसार आपले ध्येय ठरवले पाहिजे. तरच त्या क्षेत्रात आपल्याला आपले नाव कमावणे शक्य होईल. मग वय वाढण्याचे दुःख होणार नाही. उलट, आपल्या कर्तबगारीमुळे लोक आपल्याला तरुण समजत राहतील.

उत्तर : लेखक व्याख्यानांच्या निमित्ताने नेहमी परगावी जायचे. तिथे गेल्यावर जुन्या परिचयाचे, लहानपणी वर्गात असलेले, त्यांच्याशी खेळले- बागडलेले लोक भेटायचे.जुनी माणसे भेटली की विचारपूस केली जायची. कोण कोण काय काय
करतो ही माहिती दिली घेतली जायची. लेखकांकडे आकर्षक बाब होती. त्यांचे केस अजूनही काळे होते. समोरची माणसे केसांच्या या काळेपणावरून त्यांना प्रश्न विचारत.

त्यात वय जाणून घेण्यापेक्षा एक वेगळाच हेतू असायचा. बरेच जण केस काळे करण्यासाठी कलप लावतात. पण हा प्रयत्न नेहमीच अपयशी ठरतो. कलपामुळे रूप अगदी केविलवाणे बनते. लेखकांच्या एका स्नेह्याची अशी स्थिती झाली होती. त्यामुळे, लेखकांनी केस काळे राखण्यासाठी कोणती युक्ती केली असावी, याचे त्या गृहस्थाला अमाप कुतूहल होते. ते कुतूहल शमवण्यासाठी तो लेखकांच्या खनपटीला बसला. लेखकांनी थट्टा करीत करीत त्याची बोळवण केली.

उत्तर : मला माझा अभ्यास रात्री करायला खूप आवडते. सर्व जग निवांत झालेले असते. कुठेही खट्टखुट्ट होत नाही. आपण आणि फक्त आपला अभ्यास. मग कितीही जागरणं करावी लागली, तरी मला त्याचा थोडासुद्धा त्रास होत नाही. माझी एक मैत्रीण आहे. तिला सकाळी लवकर उठून, आंघोळ वगैरे करून अभ्यासाला बसायला आवडते. सकाळी चार वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत ती सलग शांतपणे अभ्यास करू शकते.

आमच्या एका मित्राला संध्याकाळी दणकून खेळून आल्यानंतर आंघोळ करून अभ्यासाला बसायला आवडते. आमच्यापैकी काही जणांना दुपारी शाळेतून आल्यावर अभ्यासाला बसणे आवडते. कारण काय, तर सकाळी वर्गात शिकवलेले मनात ताजे असते! विशेष म्हणजे त्या त्या वेळी ज्याचा त्याचा अभ्यास चांगला होतो. म्हणून प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ वेगवेगळी असते, हेच खरे.

उत्तर :-

विभक्ती
चतूर्थी
सप्तमी
षष्टी
तृतीया
पंचमी

उत्तर :-

अ ) आज स्वच्छ सुर्यप्रकाश आहे .
सामासिक शब्द – सुर्यप्रकाश विग्रह- सुर्याचा प्रकाश
आ ) सैनिकांच्या देशार्पणाचा आदर करावा .
सामासिक शब्द – देशार्पण विग्रह- देशाला अर्पण
इ ) प्रत्येकाने ऋणमुक्त राहण्याचा प्रयत्न करायलाच हवा
सामासिक शब्द – ऋणमुक्त विग्रह- ऋणापासून मुक्त
ई ) पाठ्यपुस्तकातील सर्व कविता सकेतला तोंडपाठ आहेत
सामासिक शब्द – तोंडपाठ विग्रह- तोंडाने पाठ

Share This Article