२. बोलतो मराठी स्वाध्याय इयत्ता दहावी विषय मराठी

E-Swadhyay
4 Min Read
आवडल तर शेअर करा.

उत्तर :-अ) १. योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे २. क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे.

आ) १. मराठी ढंगाचे शब्दप्रयोग २. मराठी वाक्प्रचार

उत्तर :- १. भाषेतली गंमत जाणून घेता येते. २. अद्ययावत नवीन माहिती मिळते. ३. आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत. ४. शब्द मनात कायमचा रूजतो. ५. शब्दांची पाळेमुळे किती दूरवर रुजलेली असतात, हे कळते.

उत्तर :- (अ) मराठी भाषेची खास शैली – वाक्प्रचार

(आ) मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा – हवा

(इ) शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन – शब्दकोश

उत्तर :- (अ) ऐट, डौल, रुबाब, चैन – चैन

(आ) कपाळ, हस्त, ललाट, भाल – हस्त

(इ) विनोद, नवल, आश्चर्य, विस्मय – विनोद

ई) संपत्ती, संपदा, कांता, दौलत – कांता

उ) प्रख्यात, प्रज्ञा, नामांकित, प्रसिद्ध – प्रज्ञा

उत्तर : – (अ) रस्ते एकवचनी रूप – रस्ता. वाक्य :-हा रस्ता खूपच अरूंद आहे.

(आ) वेळा एकवचनी रूप – वेळ वाक्य :- बस येण्याची वेळ झाली.

(इ) भिंती एकवचनी रूप – भिंत. वाक्य:- ही भिंत रंगित आहे.

(ई) विहिरी एकवचनी रूप – विहीर वाक्य :- ही विहीर खूप खोल आहे.

(उ) घड्याळे एकवचनी रूप – घड्याळ वाक्य :- मी आज घड्याळ घातले नाही.

(ऊ) माणसे एकवचनी रूप – माणूस वाक्य :- कोरोना आजाराच्या भितीने एकही माणूस घराबाहेर पडत नाही.

उत्तर :- (अ) पसरवलेली खोटी बातमी – अफवा
(आ) ज्याला मरण नाही असा – अमर
(इ) समाजाची सेवा करणारा – समाजसेवक
(ई) संपादन करणारा – संपादक

उत्तर :-

‘तुम्ही शहाणे आहात,’ असे अनेकदा म्हटले जाते. त्यावेळी ऐकणाऱ्याच्या समजूतदारपणावर, त्याच्या विवेकावर बोलणाऱ्याचा विश्वास असतो. आई आपल्या मुलांना हे उद्गार ऐकवते, तेव्हा तिच्या मनात आपल्या मुलांबद्दल
अशीच खात्री असते.

मात्र प्रत्येक वेळेला ‘तुम्ही शहाणे आहात,’ या वाक्याचा असा सरळ, प्रांजळ व निष्कपट अर्थ असतोच, असे नाही. काही व्यक्ती मुळातच लबाड असतात. चूक लपवण्यासाठी यी करतात. कधी कधी तर काही माणसांना खरोखरच साधी, गोष्टही कळत नाही. कितीही समजावून सांगितले, तरी त्यांना ते समजतच नाही. मग त्यांना ‘तुम्ही शहाणे आहात,’ असे ऐकवावे लागते. येथे ‘शहाणे’ हा शब्द वापरलेला असला तरी (आपण मनातल्या मनात ‘तुम्ही मूर्ख आहात,’ असेच म्हणत असतो.).

उत्तर :- ‘गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये’ लेखिकेच्या या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. सध्या मराठी भाषेवर इंग्रजी भाषेतील अनेक शब्दांचा मोठा प्रभाव पडत असताना दिसत आहे. मराठी भाषेत अनेक इंग्रजी शब्द सर्रास वापरल्या जात आहेत. ‘हे किती छान आहे’ असं म्हणण्याऐवजी ‘हे किती सुपर आहे असं म्हणल्या जाते. कॅलेंडर या शब्दाचा मराठी भाषेतील शब्द मुलांना लवकर सांगता येणार नाही. असे अनेक शब्द मुलं इंग्रजी भाषेत सहज सांगतात पण त्यांना मराठी भाषेत काय म्हणतात हे माहीत नसते.

उत्तर :- लेखिकेने मराठी भाषेला श्रीमंत म्हटले आहे. यापुढे जाऊन लेखिका म्हणतात होय माझी मराठी श्रीमंत असल्याचा मला प्रचंड अभिमान वाटतो. विविध ढंगाचे शब्दप्रयोग ही मराठी भाषेची श्रीमंती आहे. वाक्प्रचार हेमराठी भाषेची खास शैली आहे. अनेकदा एकच शब्द अनेकानेक अर्थछटा प्रकट करतो. जसे ‘खाणे’ हे एक साधे क्रियापद आहे. खाऊ खाणे, मार खाणे, शपथ खाणे, शेण खाणे, लाता खाणे अशा अनेक अर्थछटा या एका शब्दात लपलेल्या आहेत.

मराठी भाषेने अनेक भाषांमधील शब्द स्वतःच्या हृदयात सामावून घेतले आहेत. म्हणून माझी भाषा अधिकाधिक श्रीमंत होत चालली आहे असे लेखिका म्हणतात.

Share This Article