३. आजी : कुटुंबाचं आगळ स्वाध्याय इयत्ता १० वी

E-Swadhyay
10 Min Read
आवडल तर शेअर करा.

उत्तर :- चिंचोके, गजगे, खापराच्या जिबल्या, मुंगळा, भिंगऱ्या.

उत्तर :- विटीदांडू, भोवरे, कुरीचा डाव, गोट्या, सुरपारंब्या.

आजीचे दिसणे :- आजीला साडेपाच फूट उंची लाभली होती. तिचा वर्ण गोरा होता. उन्हापावसामुळे तिची त्वचा काळपटली होती. आजीच्या वयाची माणसे कमरेत वाकतात. त्यामुळे चालताना काठी घ्यावी लागते. पण आजी अजूनही ताठ कण्याने चालत होती. अजूनही तिचे सगळे दात शाबत होते. डोक्यावरचे सगळे केस पिकले होते.

आजीचे राहणीमान :- त्या काळात इरकली लुगडे उच्च राहणीमानाचे लक्षण होते. हिरव्या व लाल रंगांची नऊवारी इरकली प व अंगात चोळी हा तिचा पेहराव असे. कपाळावरचं गोंदण दिसू नये म्हणून त्यावर ती बुक्का लावी. ती नेहमी नाली ठोकलेल्या जुन्या वळणाच्या वहाणा वापरत असे.

आजीची शिस्त :- आजीची शिस्त कडक होती. सगळ्यांना सगळी कामे करता आली पाहिजेत, असा तिचा कटाक्ष होता. तिने कामांची वाटणी केली होती. ती कामे आजी सर्व क करायला लावी. दुपारच्या कामांचेही तिने केलेले असे. सुनांनी मुलांच्या बाबतीत आपपरभाव करू नये म्हणून मुलांना खाऊपिऊ घालताना आजीचा सक्त पहारा असे. गल्लीतल्या बायका दुपारी गप्पागोष्टींना येत असत. त्या वेळी ती बायकांनी सांगितलेल्या गोष्टींची शहानिशा करीत असे.

उत्तर :- १. आळस अ) उत्साह

२. आदर आ) अनादर

३. आस्था इ) अनास्था

४. आपुलकी ई) दुरावा

उत्तर :- अ) सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो.
(आ) दोन व्यक्तींतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच.
(इ) कारण नसताना हुकमत गाजवणा ऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात.

अ) कटाक्ष असणे

आ) कानोसा घेणे

इ) हुकूमत गाजवणे

इ) नजरेतून उतरणे

उत्तर :- (अ) समुद्रकिनारी आमची सहल गेली होती.
(आ) खूप दिवसांनंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद द्विगुणित झाला.

(इ) विजय अजयपेक्षा अधिक चपळ आहे.

(ई) रवीला आंबट कैऱ्या खायला खूप आवडतात.
(उ) मला गाणी ऐकण्याची खूप आवड आहे.
(ऊ) राजू कबड्डी छान खेळत होता ; परंतु त्याचा पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला.

उत्तर :- अ) वरची बाजू – वर – नवरा

आ) समज – ग्रह – तारा

इ) किनारा – काठ – लुगड्याची किनार

ई) न भंगणारे – अभंग – काव्य प्रकार

उत्तर :- ‘आगळ’ या कादंबरीच्या नायकाची आजी ही त्याच्या घराची सत्ताधीश होती. घरात तिचा वचक होता. घराबाहेरही तिच्या शब्दाला मान होता. दुपारपर्यंतच्या सर्व कामांचे नियोजन करून आजी ढाळजेत यायची. गल्लीतल्या बायकाही जमा व्हायच्या. निवडटिपण करता करता गप्पाटप्पा व्हायच्या. अनेक बातम्या, गुपिते उघड व्हायची. सगळ्याजणी बातम्यांवर चर्चा करीत. त्यातून बातम्यांची शहानिशा व्हायची.

वर्तमानपत्राचे वार्ताहर गावांतून बातम्या आणतात. संपादक या बातम्यांची शहानिशा करतात. मगच त्या बातम्या वर्तमानपत्रातछापल्या जातात. आजीच्या घराची ढाळज वर्तमानपत्रासारखीच होती. तिथे आलेल्या बातम्यांची शहानिशा झाल्यावरच बायका त्या बातम्या गावभर सांगायला मोकळ्या होत.

उत्तर :- ‘आगळ म्हणजे ऊंची-रंूंदीला नऊ इंच आणि लांबीला सहा भक्कम सागवानी वासा. एकदा आगळ लावली की चौऱ्यामोऱ्या होणे किंवा दरोडा पडणे शक्‍यच नसे. त्यामुळेच ही आगळ म्हणजे वाड्याला संरक्षणाचे एक भरभक्कम कवच लाभले होते.

प्रस्तुत उताऱ्यात आजीची भूमिकाही अगदी याच प्रकारची आहे. आजीमुळे कुटुंबात सुव्यवस्था नांदत होती. आपापसात
हेवेदावे करू शकत नव्हत्या. आपली कामे दुसरीवर ढकलू शकत नव्हत्या. सर्व कामे प्रत्येकीला करावी लागत. या वातावरणामुळे कोणावर अन्याय होत नव्हता. कोणालाही तक्रार करायला वावच राहत नसे. आजीमूळे प्रत्येकीला किंवा प्रत्येकाला भरभक्कम संरक्षण मिळाले हाते. हे संरक्षण आगळेइतकेच भक्कम होते.

उत्तर :- या पाठात ग्रामीण भागातील मागील पिढीचे चित्रण आले आहे. त्या काळातील हे एक एकत्र कुटुंब होते. आजी ही कुटुंबप्रमुख होती. कुटुंबाच्या सर्व बाबींवर, सर्व व्यक्तींवर आजीचीच सत्ता चालत असे. कोणी कोणकोणती कामे कधी व कशी करावीत, हे आजी ठरवत असे.

या पद्धतीमुळे कुटुंबातील सर्व व्यवहारांना एकसूत्रीपणा येतो आणि कामे सुरळीतपणे पार पडतात ; याचा कुटुंबालाच फायदा होतो, हे खरे आहे. पण या पद्धतीमध्ये कोणालाही स्वातंत्र्य राहत नाही. सुनांना साधा चहासुद्धा करून पिण्याची मोकळीक नव्हती. म्हणजे कोणालाही जरासुद्धा हौसमौज करण्याची परवानगी नव्हती. याचाच अर्थ कुटुंबातल्या सदस्यांना जीवनातील लहानसहान आनंदसुद्धा घेता येत नव्हते. त्यातही स्त्रियांना तर पूर्ण पारतंत्र्यातच राहावे लागे. ही चांगली स्थिती अजिबात नाही. आधुनिक काळात म्हणूनच एकत्र कुटुंबपद्धत टिकली नाही.

उत्तर – ग्रामीण भागात पूर्वी घराभोवती एक भलीमोठी, मजबूत भिंत बांधली जाई. भिंतीत एक मजबूत दार असे. त्याला कड्याकोयंडे असतच; शिवाय एक भलीभक्कम आगळ बसवलेली असे. एकदा ही आगळ लावली की घर बंद होत असे. घरातील कोणीही बाहेर जाऊ शकत नसे किंवा बाहेरून आत येऊ शकत नसे. घरावर कोणाचाही हल्ला होणे शक्‍य नसे. यामुळे घर पूर्णपणे सुरक्षित होई. म्हणून ग्रामीण जीवनात या आगळीला एक महत्त्वपूर्ण स्थान लाभले होते.

पाठाच्या शीर्षकावरून असे दिसते की, त्या कुटुंबातील आजी ही त्या कुटुंबाची एक प्रकारे आगळच होती. तिच्या दराऱ्यामुळे कुटुंबाचे सर्व व्यवहार सुरळीत चालत असत. कुटुंबाला आपोआपच पूण संरक्षण लाभायचे. घराची आगळ लावल्यावर आतल्या माणसांना बाहेर जाता येत नसे. म्हणजे त्यांच्यावर बंधने येत. त्याचप्रमाणे आजीच्या नियंत्रणामुळे
कुटुंबातील व्यक्तींवर बंधने येत. या बंधनांचा एक चांगला फायदा होई. कुटुंबातील कोणीही गैरवर्तन करू शकत नसे. त्यामुळे कुटुंबाचे व्यवहार कोलमडून पडत नसत. कुटुंबाला अंतर्गत व बाह्य असे दोन्ही अंगांनी संरक्षण
मिळे म्हणून ‘आजी : कुटुंबाचं आगळ’ हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे.

उत्तर :- (१) गोट्या (कांचा) चार-पाच गोट्या घेऊन मुलं छोट्या मैदानावर येतात. मातीत एक छोटा गोल खड्डा करतात. ज्याला ‘गल’ असे म्हणतात. ठराविक अंतरावरून मुलं हातातील गोटी गलीच्या दिशेने फेकतात. नंतर आळीपाळीने ठराविक अंतरावरून हातातील मोठ्या गोटीने गलीजवळ असलेल्या स्वतःच्या गोटीवर नेम धरून मारतात जेणे करून ती गोटी गलीत गेली पाहिजे. ज्याची गोटी आधी गलीमध्ये जाईल त्याला गूण मिळायचे. अशाप्रकारे हा खेळ आणखीही वेगवेगळ्या पद्धतीने खेळता येतो.

(२) लगोरी या खेळात ७ ते ११ खेळाडूंचे दोन संघ असतात. या खेळात वापरल्या जाणाऱ्या चपट्या लाकडी गोल ठोकळ्यांना लगोरी म्हणतात. पूर्वी ही लगोरी फरशीच्या व विटांच्या तुकड्यांची असायची. प्रत्येक संघातील एक
एक खेळाडू लगोरी फोडण्यासाठी येतो. लगोरी फोडण्यासाठी तीन वेळा चेंडू मारण्याची संधी मिळते. लगोरी फोडण्यासाठी फेकलेला चेंडू अडविण्यासाठी वा झेलण्यासाठी रचलेल्या लगोरीच्या मागे विरूद्ध संघाचा एक प्रमुख क्षेत्ररक्षक असतो.

ज्या संघाने लगोरी फोडली त्याच संघातील खेळाडूंनी लगोरी रचने महत्वाचे. लगोरी रचताना विरूद्ध संघाने मारलेला चेंडू
अंगाला स्पर्श करू नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे. लगोरी रचण्याबद्दल प्रत्येक लगोरीस ५ गुण मिळतात. अशा प्रकारे प्रत्येक संघास ८ मिनिटे दिली जातात. त्यानंतर परत नव्याने लगोरी पाडण्यास संघ तयार होतात.

(३) विटीदांडू या खेळामध्ये झाडाचे लाकूड दांडू स्वरूपात वापरले जाते. याशिवाय विटीसाठी झाडाच्या लाकडाचा छोटासा भाग घेऊन त्याला दोन्ही बाजूने टोक केले जाते. खेळात अनेक खेळाडू सहभागी होऊ शकतात. हा खेळ वैयक्तिक व सांघिक दोन्ही पद्धतीने खेळता येतो. टॉस करून राज्य कुणावर ते ठरवले जाते. जमिनीवर छोटासा खड्डा खोदून गल तयार केली जाते. त्या खड्ड्यात विटी आडवी ठेवून दांडूने ती दूर भिरकावली जाते. बाकीचे खेळाडू मैदानात विटी झेलण्यासाठी उभे असतात.

जर कोणत्याही खेळाडूने विटी झेलली तर विटी मारणारा खेळाडू बाद होतो. बाद झाला नाही तर मग त्याने विटीने गुण मिळवायचे. त्यासाठी विटीच्या एका टोकावर दांडू मारून ती विटी हवेत उडवायची आणि जमिनीवर पडू न देता वरच्यावर हवेत उडवत रहायची. विटी दांडूच्या साह्याने हवेत उडवणे हे या खेळातले सगळ्यात मोठे कौशल्य आहे. यानंतर दांडूच्या साह्याने विटी बॅटने बॉल मारतो त्याप्रमाणे दूर भिरकवायची. ती जिथे पडेल तिथे जाऊन पुन्हा ती दूर भिरकवायची.

तिथून पुन्हा त्या खेळाडूंनी विटी फेकायची जर विटी दांडूला लागली तर खेळाडू बाद होतो. हा खेळाडू विटी घेऊन जाईल तिथून त्याने पार केलेल्या अंतराच्या प्रमाणात अंक मोजले जातात. विटी एकदाच मारली तर हे अंतर दांडूने मोजले जाते. हवेत उडून मारली असेल तर अर्ध्या दांडूने हे अंतर मोजले जाते आणि जर हवेतल्या हवेत दोन वेळा विटीला उडवलं असेल तर हे अंतर दांडूने मोजले जाते. अशाप्रकारे ज्या खेळाडूचे या खेळातील कौशल्य जास्त तो अधिक गुण मिळवतो.

(४) भोवरा लाकडापासून तयार केलेल्या शंकू आकाराच्या भोवऱ्याला सहसा लोखंडाचे एक निमुळते टोक असते. त्यास आरू असे म्हणतात. दोरी किंवा जाळी गुंडाळण्यासाठी केलेली ही सोय असते. दोरी भोवऱ्याच्या सभोवती गुंडाळून त्याचे गाठ मारलेले एक टोक हातात धरून भोवरा जमिनीवर झटकल्याने फेकला जातो व फिरवला जातो.

सध्या प्लास्टिक व फायबरचे भोवरे देखील बाजारात उपलब्धआहेत. कपड्याने बोटे बांधून भोवरा गरागरा फिरवला जातो. ज्याच्यावर डाव येईल त्याचा भोवरा रिंगणात मांडतात. बाकीचे खेळाडू त्या भोवऱ्याला गुच्चे मारतात. या खेळात काही वेळा भोवरे फुटतात. भोवरा झेलणाऱ्या मुलांना जखमा देखील होतात म्हणून हा खेळ अतिशय सावधपणे खेळणे गरजेचे आहे.

(५) सुरपारंब्या हा खेळ वडाच्या झाडावर खेळला जातो. या खेळात ज्याच्यावर डाव आलेला असतो तो झाडाच्या खाली असतो आणि बाकीचे झाडावर. झाडाच्या खाली एक छोटे वर्तुळ आखलेले असते. त्या वर्तुळात एक ते दीड फुटाची एक छोटी काठी ठेवलेली असते. बाकीच्या सदस्यांपैकी एकाने ती काठी लांब फेकायची आणि सर्वांनी झाडावर चढून बसायचे.

उत्तर :- गावाकडे खेळले जाणारे विविध खेळ आता लोप पावत आहेत. त्या खेळांची जागा आधुनिक खेळ क्रिकेट, बुद्धिबळ, कॅरम मोबाईल व संगणकावरील खेळ यांनी घेतलेली आहे. गावाकडचे खेळ हे विविध अंगी असल्याने आरोग्य व सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने खूप महत्वाचे होते, परंतु शहरीकरणाने हे खेळ मागे पडून आधुनिक खेळांचे आकर्षण मुलांच्या मनात निर्माण झाले आहे.

उत्तर :-

(१) आगळ – वाड्याचा दिंडी दरवाजा बंद करण्यासाठी त्याला आतल्या बाजूने असलेला लाकडी अडसर.
(२) ढाळज – वाड्यात प्रवेश केल्यानंतर उजव्या, डाव्या बाजूंना असलेली देवडी/पडवी/बसण्यासाठीची जागा.

Share This Article